
पंढरपूर ते दापोली बस पोफळी येथे संरक्षक भिंतीवर धडकली
पंढरपूर ते दापोली असा प्रवास करत असताना एस्.टी. बसची संरक्षक भिंतीला धडक बसून अपघात झाल्याची घटना मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी ३.३०च्या सुमारास पोफळी तांबे कँटीन येथे घडली. या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी अलोरे – शिरगांव पोलीस स्थानकात एस्.टी. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल भाऊ कांबळे (३०, रा. परमेश्वर पिंपळी, मु. पो. कुरूळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
www.konkantoday.com




