
मधु दंडवते, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूरनाविन्यपूर्ण आणि स्वयम रोजगारास पूरक अभ्यासक्रमांचा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी शुभारंभ
रत्नागिरी, दि. ७ ) : मधु दंडवते, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर व शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, राजापूर येथील अल्पमुदतीच्या विविध नाविन्यपूर्ण आणि स्वयम रोजगारास पूरक अशा अभ्यासक्रमांचा शुभारंभ ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे. या अभ्यासक्रमाचा युवक युवती जे रोजगार आणि स्वयंरोजगार करू इच्छितात, अशा सर्वांनी आपले प्रवेश ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य टि.एस मिसाळ यांनी केले आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संस्थेमध्येच पार पाडल्या जात आहे. प्रवेश शुल्क सद्या फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेले असून १) सुईंग मशिन ऑपरेटर २) टेक्निशन एअर कंडिशन ३) इलेक्ट्रिकल टेक्निशन व शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र, राजापूर येथे १) इलेक्ट्रिकल डोमेस्टिक सोलुशन २) फिटर फॅब्रिकेशन हे अल्पमुदत अभ्यासक्रम दिनांक ८ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभाला अधिकाधिक संख्येने प्रशिक्षणार्थी तसेच त्यांची पालकांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
000




