रत्नागिरी शहरात पुन्हा घरपोडीचे सत्र सुरू,छत्रपती नगर येथे घरफोडी करून चोरट्यानी मोठा ऐवज लांबविला..


रत्नागिरी शहरात पुन्हा घरपोडीचे सत्र सुरू झाले आहे गेले काही दिवस चोऱ्यांचे सत्र थांबले होते मात्र रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे घरफोडी झाली आहे. हसीना अन्वर काझी (राहणार छत्रपती नगर साळवी स्टॉप रत्नागिरी) यांचे घर चोरट्याने फोडून तब्बल 15 तोले सोने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. काझी यांच्या शेजारी राहणाऱ्याने सकाळी साडेसातच्या सुमारास सांगितले दोन्ही बाजूचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद करण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button