
न्यायमूर्ती आरती साठे यानी राजीनामा द्यावा : कॉंग्रेस नेते अशोक जाधव यांची मागणी…
माजी अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र कॉंग्रेस आणि शेतकरी-कष्टकरी संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती आरती साठे यांच्याकडे न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयातील नियुक्तीच्या पदावर कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या प्रभावाखाली राहणारी व्यक्ती असल्यास निरपेक्ष न्यायदानावर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देऊन भारतीय संविधान आणि न्यायसंहिता यांचा आदर राखावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायमूर्ती आरती साने यांनी राजीनामा दिला नाही, तर २५ सप्टेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशासनी त्यांनी दिला आहे..
www.konkantoday.com




