चिपळूण जलतरण तलावाचे सेवा शुल्कात कपात


चिपळूण जलतरण तलावासाठी नागरीकाकडून स्विकारण्यात येणार्‍या सेवाशुल्कात ठेकेदाराने केलेली परस्पर वाढ मागे घेण्यात आली आहे. तसे लावलेले दरपत्रकही काढून टाकण्यात आले आहे. तक्रारीनंतर नगरपरिषदेने ही कार्यवाही केली असून मे महिन्यापासून ठेकेदाराने ग्राहकांकडून घेतलेले जादाचे पैसे वसूल करण्याची मागणी होत आहे.
नागरीकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने हा तलाव साकारला आहे. काही महिने मागे जाता येथे सुविधांचा अभाव होता. त्यामुळे नगर परिसदेने लाखो रुपये खर्च करुन या
तलावाला नवसंजीवनी दिली आहे. तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे येथे असलेली विहीर पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी रोहीत खाडे यांनी साफ करुन घेत तोही प्रश्न मार्गी लावला, असे असताना प्रशासनाला कोणतीही लेखी कल्पना न देता ठेकेशराने शुल्कात वाढ केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button