भंगार व्यावसायिकाकडे चोरीची दुचाकी असल्याचा संशय, पोलिसांत गुन्हा दाखल


रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील भंगार व्यावसायिकाच्या दुकानात चोरीची दुचाकी आढळून आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी या व्यावसायिकाकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाही. तानाजी बाबासो गोसावी (४१, रा. रहाटाघर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. शहर पोलिसांनी या व्यावसायिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडून २ ऑगस्ट रोजी आठवडा बाजार परिसरात गस्त घालण्यात येत होती. यावेळी आठवडा बाजार येथील भंगार दुकानामध्ये पोलिसांना एक दुचाकी निदर्शनास आली. या दुचाकीबाबत पोलिसांनी दुकानाचे मालक तानाजी गोसावी यांच्याकडे चौकशी केली असता कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. तसेच गोसावी हे समाधानकारक उत्तरे पोलिसांना देवू शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी गोसावी यांच्याविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button