
सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा मुंबईकडून रत्नागिरीकडे मार्गस्थ
नवसाला पावणारा सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा मुंबईकडून रत्नागिरीकडे मार्गस्थ झाला असून श्री रत्नागिरीच्या राजा चे वाशी येथे आगमन झाले असता प्रतिवर्षीप्रमाणे वाशी येथील श्री वैभव शेठ नाईक मित्रमंडळातर्फे श्री रत्नागिरीच्या राजा चरणी सेवा अर्पण करण्यात आली. त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते नेताजी पाटील, निमेश नायर, मुन्ना देसाई, दीपक पवार, परेश सावंत, मनीष मोरे, अमरेश पावसकर, मनोज साळवी, राजेश तिवारी, राजा पिलणकर, लक्ष्मीकांत सावंत, सूरज जुवाटकर, रोहित सावंत, अमित बने, विशाल सावंत ह्यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.