
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधून रेल्वे प्रवाशाची लाखाची रोकड लांबवली.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीतील प्रवाशाची १ लाख रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २६ जून रोजी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान उक्षी रेल्वे स्थानकानजीक घडली. सुरज कमलाकर भोसले (३०, रा. गावखडी, रत्नागिरी) असे या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली.सुरज हे २६ जून रोजी सकाळी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीने प्रवास करत होते. सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास गाडी उक्षी रेल्वे स्थानकानजीक गेली असताना सुरज यांना झोप लागली. यावेळी अज्ञात चोरट्याने याचा फायदा उठवत त्यांच्याकडील १ लाख रुपयांची रोकड चोरून नेली, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.www.konkantoday.com