घराबाहेर पडायला बंदी! सोनम वांगचुक यांनी व्हिडिओ शेअर करत दाखवला पोलीस बंदोबस्त!

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण संवर्धन व सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणारे सोनम वांगचुक यांचा अमरावती दौरा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. सोनम वांगचुक यांनी स्वत: समाज माध्यमांवर चित्रफित प्रसारित करून वस्तुस्थिती समोर आणली आहे. या चित्रफितीत सुरक्षा रक्षक त्यांना घरातून बाहेर जाण्यास रोखताना दिसत आहेत.

नेमके घडले काय?

अमरावतीच्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण संवर्धन व सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणारे सोनम वांगचुक यांच्या आज होणार होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पण, सोनम वांगचुक यांचा दौरा रद्द झाल्याने पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले असून घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे, मला घराबाहेर पडू दिले जात नाहीये, असा आरोप वांगचुक यांनी केला आहे. समाज माध्यमांवर प्रसारित केलेल्या चित्रफितीत सोनम वांगचुक यांनी सांगितले की, बुधवारी रात्रीपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक सुरक्षा रक्षक तैनात आहेत, वाहने उभी आहेत अणि तंबू देखील उभारण्यात आले आहेत. चारही बाजूंनी सशस्त्र जवान तैनात असल्यामुळे त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश की दुसरे काही?

केंद्रशासित प्रदेश लडाखचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर, सोनम वांगचुक यांना त्यांच्या निवासस्थानीच थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सोनम वांगचुक यांनी दुसरी चित्रफित प्रसारित केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांनी आम्हाला विचारले की, मी दावा केल्याप्रमाणे ही खरोखरच ६० दिवसांची नजरकैद आहे की, लडाखच्या डीजीपींनी ट्विट केल्याप्रमाणे केवळ ‘त्यांच्या निवासस्थानी राहण्याचा सल्ला’ आहे. मॅजिस्ट्रेटचा आदेश अस्पष्ट असल्याने आम्ही व्हिडिओ चित्रित प्रयोग केला, असे वांगचुक यांनी सांगितले. ते नजरकैदेत आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. यावरून आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, हे स्पष्ट होते, असे सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button