रत्नागिरी तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाची १५ नोव्हेंबरची लेखी परीक्षा पुढे ढकलली


रत्नागिरी, दि. १३ ): रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाच्या आस्थापनेवरील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी येत्या रविवारी, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी चिपळूण येथे होणारी लेखी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
या पदभरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे वितरित करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे दि. १२ नोव्हेंबर २०२६ चे पत्र आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या दि. १३ नोव्हेंबर २०२६ च्या निर्देशानुसार ही परीक्षा स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पदभरतीचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. रत्नागिरी तालुका महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरीच्या महसूल नायब तहसीलदार रिद्धी गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
०-०-०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button