
अमेरिकेत मोठी खळबळ, सर्व विमान उड्डाणे अचानक रद्द, हजारो प्रवासी अडकले
अमेरिकेतून एक मोठी धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली. अमेरिकेतील विमान सेवा पूर्णपणे ठप्प झाली. एकही विमान उडत नाही. एक मोठी समस्या निर्माण झाली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.सध्याच्या घडीला एकही विमान उड्डाण घेत नाहीये. अमेरिकेतील विमाने जमिनीवरच रोखून धरल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून विमानतळावर एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. स्थिती अधिक गंभीर होत आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका दणक्यात पूर्ण विमान सेवा विस्कळीत झाली. ही समस्या नेटवर्क राऊटरमधील बिघाडामुळे झाल्याचे कळत आहे. त्याचा परिणाम पूर्ण अमेरिकेतील विमान सेवेवर झाला.
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एका अलर्टद्वारे कळवले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. या घटनेमुळे 7000 हून अधिक विमानांवर परिणाम झाला आहे. थेट 7000 विमानांचे उड्डाण थांबवण्याची वेळ आली. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.




