मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला.मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिकमुक्त झाला पाहिजे, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. मंत्रालयात प्रथमच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.मुंडे पुढे म्हणाल्या की, शासकीय व खासगी कार्यालयांत सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो, म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम मंत्रालयातील कामकाज कागदविरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे. पेपर व प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. ‘प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो’ अशी शपथ आजपासून घेण्याचे आवाहनही मुंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button