वैश्य वाणी समाजातील लोकांना वैश्य वाणी म्हणूनच दाखला मिळावा आणि त्याची जात पडताळणी देखील व्हावी- आयोगासमोर आग्रही मागणी


आज रत्नागिरी येथे इतर मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांच्यासमोर वैश्य वाणी समाजाच्या जातीचा दाखला व जात पडताळणी संदर्भात येत असलेल्या अडचणी बाबत चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी वैश्य जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विकास शेटये यांनी वैश्य समाजातील लोकांना दाखला मिळवण्याबाबत येणाऱ्या अडचणी बाबत आयोगासमोर आपली भूमिका मांडली यावेळी महिला जिल्हाअध्यक्ष सौ. स्मिताताई लाड. युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.सौरभ मलुष्टे, समाजाचे मार्गदर्शक श्री.हेमंत वनजू, तसेच चिपळूणचे समाजाचे अध्यक्ष श्री.पंकजशेठ कोळवणकर सचिव श्री. अमोल टाकळे,संचालक श्री.नयन साडविलकर, श्री.संतोष टाकळे, लांजा तालुका वैश्य अध्यक्ष श्री.हेमंत शेटेय सचिव श्री. पाडावे, श्री. प्रभाकर कोळवणकर, श्री. योगेश शेटे, मंडणगडचे श्री. कौस्तुभ भिंगार्डे. देवरुख येथील श्री.बापू गांधी, श्री. श्रीकृष्ण जागूष्टे, श्रीधर जागूष्टे श्री.संतोष लाड, रत्नागिरीचे श्री.चिखले. बावनदी चे श्री पाथरे एमकेसीएलचे श्री कोलते सर सौ. रेडीज आदी मान्यवर वैश्य बांधव उपस्थित होते. पुराव्यासह काही केसेस आयोगाचे सदस्य आणि जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांचे समोर सादर करण्यात आल्या. भविष्यवाणी समाजाच्या मागणीचा योग्य तो विचार करून पुढील दोन महिन्यात संपूर्ण कोकणातील वैश्य वाणी समाजातील लोकांना वैश्य वाणी म्हणूनच दाखला मिळावा आणि त्याची जात पडताळणी देखील व्हावी ही आग्रहाची मागणी यावेळी करण्यात आली. वैश्य वाणी समाजाच्या मागणीनुसार पुढील दोन महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन समिती सदस्य यांनी दिले आहे संपूर्ण जिल्हाभरातून आलेल्या वैश्य आणि समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button