मुंबईत विक्रोळी येथे 22 व्या मजल्यावरून तरुणीने उडी मारून केली आत्महत्या, शरीराचे झाले दोन तुकडे


मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये एका तरुणीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केलीकन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा प्रकार घडला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आहे. या तरुणीने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे विक्रोळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना अत्यंत भयंकर असल्याचे प्रत्यदर्शींकडून सांगण्यात आले. सोमवारी रात्री या तरुणीने इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असलेल्या टेरेसवर जाऊन खाली उडी टाकली. इतक्या उंचावरुन खाली पडल्यामुळे या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य अंगावर अक्षरश: काटा आणणारे होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. या तरुणीने नक्की कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अजून कळू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button