
मदत करणार्यालाच टोपी घातली, पेट्रोल संपलय म्हणून आणण्यासाठी दुचाकी घेवून पलायन केले.
पेट्रोल संपले आहे, त्यासाठी दुचाकी द्या, अशी बतावणी करुन फसवणूक करणार्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामशंकर श्रीसंतराम (३६, रा. एमआयडीसी रत्नागिरी मूळ उत्तरप्रदेश) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी हा २२ मे रोजी सकाळी ९ वाजता तक्रारदार यांच्याकडे येवून माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे, ते आणण्यासाठी तुमची दुचाकी द्या, अशी विनंती केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी आपली दुचाकी त्याला दिली. मात्र संशयित आरोपी हा दुचाकी घेवून गेल्यानंतर परत आला नाही. यावेळी आपली दुचाकी परत न करून फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली.www.konkantoday.com