मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक व टँकरमध्ये भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे मंगळवारी सकाळी ट्रक आणि टँकर यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या केबिन एकमेकांत अडकल्याने ट्रकचालक वाहनातच अडकून पडला होता. युद्धपातळीवर बचाव कार्य करीत त्याला बाहेर काढण्यात आले. अपघात पुलावरच घडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या धडकेत ट्रकचालक व टँकरचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्गावरील अपूर्ण आणि ढिसाळ कामांमुळे अशा प्रकारच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.महामार्गाचे अर्धवट काम अपघाताला आमंत्रण देत आहे. प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर आणखी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट काम, असुरक्षित वळणे आणि पथदिव्यांचा अभाव यामुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये झपाट्याने वाढ होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button