
लांजा तालुक्यातील गोविळ येथे आंब्याच्या झाडावरून पडून तरूणाचा मृत्यू.
लांजा तालुक्यातील गोविळ येथील प्रौढाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुहास गंगाराम लाखण (५३, रा. गोवीळ, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. लाखण हे ५ मे रोजी आंबे काढण्यासाठी चढले होते. यावेळी हातात धरलेली फांदी तुटली आणि खाली पडले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com