
शिवसेना दापोली तालुक्याच्या वतीने कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी दापोली पोलीस ठाण्यात निवेदन सादर
दापोली २५:- शिवसेनेचे मुख्य नेते,माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या विरोधात कुणाल कामरा या काॅमेडीयन व्यकीने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याबद्दल शिवसेना दापोली तालुक्याच्या वतीने त्याच्या दुष्कृतीचा निषेध करण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना दापोली तालुक्याच्या वतीने दापोली पोलीस ठाणे या ठीकाणी मपोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी दापोली शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेश राजे,दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई ,माजी जि प.सभापती चारूता कामतेकर,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर,महिला शहराध्यक्ष रसीका पेठकर,माजी नगरसेवक प्रकाश साळवी,युवतीसेना संघटक कीर्ती परांजपे, छोटा व्यापारी संघटना अद्यक्ष राजेद्र बोथरे, उपशहरप्रमुख मंदार केळकर,अनिल पवार, उपशहरप्रमुख अशोक माने,उपशहरप्रमुख आप्पा भंडारी ,अशोक वडके आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.