नाखरे येथे झालेल्या अपघातात तरुण ठार.

रत्नागिरी : तालुक्यातील खांबडवाडी-नाखरे येथे इको कार आणि ओला दुचाकी समोरा समोर धडकून भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आज (२६ मार्च) रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसूरकर (३०, रा. उंबरवाडी स्टॉप नाखरे, रत्नागिरी) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात इको कार चालक अनिकेत खाके (रा. नाखरे, रत्नागिरी) यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी दुपारी चंद्रवदन शिंदे दसूरकर हा आपल्या ताब्यातील ओला दुचाकी (एमएच-08-बीजी-2916) घेऊन पावस ते नाखरे असा आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास अनिकेत खाके हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-47-एबी-2194) घेउन नाखरे ते पावस असा येत होता. ही दोन्ही वाहने खांबडवाडी येथे आली असता इकोकार चालक अनिकेत खाकेचा आपल्या कारवारील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरून येणाऱ्या चंद्रवदनच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे चंदवदनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button