
सरकारी कर्मचार्याला फसवल्याचा आरोप असलेल्या व्याजी व्यावसायिक नीलेश कीरला अटक.
जमीन विक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचार्याला तब्बल २२ लाख रुपयांचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या व्याजी व्यावसायक नीलेश कीर (४५, रा. भाटीमिर्या कीरवाडी) याला शहर पोलिसांकडून मंगळवारी अटक करण्यात आली. कीर याने वकीलाला हाताशी धरून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अटक टाळण्यासाठी कीर याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताच मंगळवारी शहर पोलिसांकडून कीर याला अटक करण्यात आली.www.konkantoday.com