
कमी येणार्या पाण्यामुळे चिपळूण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत.
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथून वाशिष्ठी नदीत सोडल्या जाणार्या कमी पाण्यामुळे गोवळकोट परिसर, तर ग्रॅव्हीटीच्या कामामुळे अन्य भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगर परिषदेकडून सोडल्या जाणार्या पाण्याच्या वेळेत मोठा बदल झाल्याने महिलावर्गाचे वेळापत्रक बिघडले आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.शहराचा पाणीपुरवठा वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
मात्र ही नदी बारमाही नसल्याने उन्हाळ्यात कोळकेवाडी येथे होणार्या वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणार्या पाण्यावर योजना चालतात. अर्धा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेर्डी-माळेवाडी येथे जॅकवेलजवळ नदीत बंधारा बांधल्याने येथ कायम पाणी असते. त्यामुळे येथून पाणीपुरवठा करण्यात अडचण येत नाही. मात्र सध्या ग्रॅव्हीटी योजनेच्या साठवण टाक्यांची डिबीजे महाविद्यालय परिसर, खेड आदी भागात कामे सुरू असल्याने येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.www.konkantoday.com