
निवळी-जयगड मार्गावर कारच्या धडकेत पादचारी महिला जखमी.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील ओरी फाटा येथे कारच्या धडकेत पादचारी महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. मानसी प्रदीप कुळ्ये (४०) व प्रभावती सांबरे (५९, रा. धामणसे, ता. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांनी कारचालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मकरंद महादेव कोयंडे (२७, रा. शिवडी कोळीवाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. मकरंद हे २७ जानेवारी रोजी आपली कार (एमएच ०१ ईव्ही ९९९७) येथून गणपतीपुळे ते मुंबई असे जात होते. सकाळी १० च्या सुमारास त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूने चालणार्या दोघा महिलांना त्यांची धडक बसली.www.konkantoday.com