सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा घाटातील चेक नाक्यावरील तपासणीत वाहनात 14 लाखाची रोकड सापडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील फोंडाघाट चेक नाक्यावर वाहनांच्या तपासणी दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणारी पांढऱ्या रंगांची माई हुंदाई कार ( एम एच ०९ जीए ९४३९ ) चालक – जयसिंग मल्हारी पाटीलही हे घेऊन जात असताना फोंडाघाट येथील चेक नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी तपासणीकरिता थांबवली.यावेळी सदर कारमध्ये सुमारे १४ लाख ४५ हजार ४०० रुपयाची रोकड आढळून आली. ही कारवाई बुधवारी दुपारी १२ वा. च्या. सुमारास करण्यात आली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची रोकड घेऊन कारमधील इसम जयसिंग मल्हारी पाटील हे कोल्हापूर येथे जात होते. तसेच ती रोकड एका सळी व्यापाऱ्याची असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती सध्या निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू झाल्याने वाहनांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button