
दुरूस्तीच्या कामामुळे तेजससह जनशताब्दी ३१ डिसेंबरपर्यंत दादरपर्यंत.
सीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकातील १२ ते १३ फलाटसह अंतर्गत दुरूस्ती कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे २२१२० क्रमांकाची मडगांव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस व १२०५२ क्रमांकाची जनशताब्दी एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत. या दोन्ही एक्सप्रेस दादर स्थानकातून सुटतील. १२१३४ मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंत संपणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. www.konkantoday.com