
हिसार-कोईमतूर २ पासून अतिरिक्त डब्यांची धावणार.
कोकण मार्गावर धावणार्या हिसार-कोईमतूर वातानुकुलीत साप्ताहिक एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. यामुळेच एक्प्रेसला २ ऑक्टोबरपासून कायमस्वरूपी दोन वातानुकुलीत डबे वाढवण्यात येणार आहेत. यामुळे एक्सप्रेस २२ डब्यांची धावणार आहे. २२४७५/२२४७६ क्रमांकाच्या वातानुकुलीत साप्ताहिक एक्सप्रेसला टू टियर एसी श्रेणीचा एक व थ्री टियर एसी श्रेणीचा एक असे दोन कोच कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.www.konkantoday.com