
कोकण विकासासाठी भूमधून आंदोलन सुरू
कोकणातील विकासाच्या प्रमुख मागण्यांसाठी समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलनाला तालुक्यातील भू येथून सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मागण्या पूर्ण करा, अन्यथा मतदान करणार नाही, असा पवित्रा संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे.कोकणातील शेतकरी व मच्छिमारांचे प्रश्न जो पर्यंत सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छिमारांना त्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. हे आंदोलन २२ ते २४ ऑगस्टदरम्यान तालुक्यातील भू खिणगिणी या गावामध्ये सुरू राहणार आहे.२६ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात होणार आहे. जोपर्यंत मच्छिमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. www.konkantoday.com