
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातअपघातात दोघांचा मृत्यू
चिपळूण ०८ :- मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा महामार्गवर कामथे येथील रस्त्यालगत 22 चाकी कंटेनर उभा होता याचवेळी मुंबईहून वेंगुर्ल्याकडे जाणाऱ्या आयशर गाडीने येऊन धडक दिली .सदरच्या धडकेत आयशर गाडीतील ऋत्विक शिरोडकर,रामकृष्ण सेनी हे दोघेजण यांचा जागीच मृत्यू झाला . सदरच्या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.