लांजातील खेरवसे गावात बिबट्याचा मुक्त संचार, शेतकर्‍याच्यात भीतीचे वातावरण

लांजा ः लांजा तालुक्यातील खेरवसे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. येथील पाळीव जनावरांवर हल्ले करून बिबट्या त्यांचा फडशा पाडीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले बरेच दिवस या गावातील परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील चंद्रकांत विश्‍वासराव यांच्या अभिजित शेती फार्म येथील दोन गायींना मारण्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकटे रात्री अपरात्री फिरणे भितीदायक झाले आहे. बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमुळे राहण्याची ठिकाणे नाहीशी झाली आहेत. तसेच भक्ष्यही मिळेनाशी झाल्यामुळे बिबट्यांनी नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button