
देवरूख ग्रामीण रूग्णालयात सांडपाणी प्रक्रिया प्लान्टचे काम सुरू
आपलं देवरूख सुंदर देवरूख ग्रुपच्या यशस्वी पाठपुराव्याानंतर देवरूख ग्रामीण रूग्णालयात अत्यावश्यक असलेला सांडपाणी प्रक्रिया प्लान्ट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात तरी नुतन इमारतीतून कारभार सुरू होईल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र नूतन इमारतीत कारभार सुरू होण्याला केव्हाचा मुहूर्त भेटणार, असा सवाल देवरूखवासियांतून उपस्थित होत आहे.देवरूख ग्रामीण रूग्णालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याने त्याच जागेवर कोट्यवधी खर्च करून नूतन इमारत उभारण्यात येत आहे. इमारत उभारणीचे कााम संथ गतीने झाल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र वीज जोडणी नसणे, सांडपाणी प्रक्रिया प्लान्ट नसणे यामुळे विलंब होत आहे. www.konkantoday.com