
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत २१. १९ टक्के मतदान
*रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.१७ टक्केच मतदान झाले होते. पुढील दोन तासात १३.०२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २४.१८ टक्के मतदान झाले. रत्नागिरीत सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात केवळ १५ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात २३.६३ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात २२.०९ टक्के, कुडाळ मतदारसंघात २१.०४ आणि सावंतवाडी मतदार संघात २१.७४ टक्के मतदान झाले आहे.www.konkantoday.com