भोस्ते जगबुडी पूल दुरूस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण

भोस्ते जगबुडी पुलावरून सतत सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकला आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांचा जीव टांगणीवर आहे. प्रवाशांकडून पुलाच्या दुरूस्तीची आजवर देण्यात आलेली आश्‍वासने हवेतच विरली आहेत. यामुळे दुर्घटना पडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल वाहनचालकांसह पादचार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.भोस्ते जगबुडी पुलावरून वहनांची सतत वर्दळ सुरू असते. वेळेच्या बचतीसाठी सर्वच वाहनांना भोस्ते पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो. रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी वाहनचालक याच पुलाचा सर्रासपणे वापर करतात. भोस्ते, अलसुरे, कोंडिवली, निळीक आदी भागातील ग्रामस्थ दैनंदिन कामासाठी शहरात येण्याकरिता याच पुलाचा वापर करतात. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button