
खेड-बहिरवलीत भीषण आगीत घर भस्मसात
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली नं. १ मोहल्ला येथे बुधवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात झाले. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत घरासह गृहोपयोगी साहित्य भस्मसात होवून लाखोंची हानी झाली.बहिरवली नं. १ मोहल्ला येथे वास्तव्यास असलेल्या बशीरा कासिम चौगुले यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. या दुर्घटनेने त्या पूर्णतः बेघर झाल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा भडका उडाला. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. आगडोंब उसळलेला असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोटही झाला यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थही मिळेल त्या साधनााने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. www.konkantoday.com