
साखरपा गुरववाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथील तरुणावर सोमवारी रात्री ९ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला. या
घटनेमुळेग्रामस्थ
भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त
करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात नीरज सुभाष लिंगायत रा. साखरपा (२१, गुरववाडी) हा जखमी झाला. नीरज सोमवारी रात्री दुचाकीने घरी जात होता.
यावेळी पाटोळेवाडी फाट्याजवळ बसलेल्या बिबट्याने अचानक नीरज याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये नीरजच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलात निघून गेला. निरजवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले
www.konkantoday.com