महावितरणच्या नूतन मीटर चाचणी प्रयोगशाळा इमारतीचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते उदघाटन


रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयातील लघु प्रशिक्षण केंद्र व मीटर चाचणी प्रयोगशाळेच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण झालेल्या इमारतींचे उद्घाटन कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.परेश भागवत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना मुख्य अभियंता श्री.परेश भागवत म्हणाले की, प्रशिक्षणामुळे कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. परिणामी ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होते. त्याव्दारे कंपनीची प्रतिमा उजळते. कर्मचार्‍यांनी आपल्या कामाबाबत नेहमी अद्यावत असायला हवे. आपले ग्राहक सेवेचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे. स्वत:चे आर्थिक नियोजन चोख ठेवावे. त्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. याप्रसंगी अधिक्षक अभियंता जितेंद्र फुले (सांघिक कार्यालय मुंबई), अधिक्षक अभियंता स्वप्नील काटकर (रत्नागिरी), अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, कार्यकारी अभियंता (चाचणी) अजित अस्वले, कार्यकारी अभियंता (प्रशासन) नितीन पळसुलेदेसाई, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी (रत्नागिरी), कैलास लवेकर (चिपळुण), विशाल शिवतारे (खेड), कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अनुराधा अंधानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन उपकार्यकारी अभियंता बाजीराव आबीटकर यांनी पाहिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button