मिरजोळेत बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला


रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे जांभुळफाटा येथे बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारा ट्रक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पकडला. शहरालगतच्या परिसरात उनाड फिरणार्‍या गुरांना पकडून ट्रकमध्ये भरून नेले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरांची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती शिवहिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार शिवहिंदुस्थानचे कार्यकर्ते जांभुळफाटा येथून जाणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवून होते. १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी (एमएच ०८ एपी ३०२१) ही गाडी अडवून ठेवली. गाडीचा हौदा काळ्या ताडपत्रीने झाकण्यात आला होता. ताडपत्री उघडून पाहिल्यावर लक्षात आले की गाडीमध्ये २ बैल संशयितरित्या तोंडाला दोरीने करकरून बांधून ठेवण्यात आले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button