ठाकरे गटातील ९ आमदार संपर्कात-उद्योगमंत्री उदय सामंत


उद्धव ठाकरे गटातील ९ आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत. हे काहींना कळल्यामुळे ते प्रकाशझोतात येवू नये, यासाठी शिंदे गटाचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या विश्‍वासातील आमदार आहोत. कुठेही कोणी जाणार नसल्याचे विरोधकांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुनावले.
शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा रत्नागिरीत हॉटेल विवेक येथे बुधवारी मेळावा झाला. या मेळाव्यानंतर मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या शिवसेनच्या संपर्कात असलेल्या ९ आमदारांचा विषय पुन्हा प्रकाशात येवू नये, यासाठी काहींनी आमचा आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा कांगावा केला आहे. संपर्कात असलेल्या १३ मधले ९ राहिले होते. आता पुन्हा तो आकडा १३ होवू शकतो, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button