दापोली तालुक्यातील भोमडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल


दापोली तालुक्यातील भोमडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सचिन जाधव (२२, भिंगळोलीआदिवासीवाडी, ता. मंडणगड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव याने भिंगळोली आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केले. ही घटना ३० मे रोजी दापोली तालुक्यातील भोमंडी येथे घडली. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम ३७६ (२)(ग). (ह) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ५ (र) (२) (ल), ६ नुसार जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button