नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिराला विविध माध्यमांतून पाच कोटी ६ लाख ८९ हजार ८४६ रुपयांचे उत्पन्न


नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिराला विविध माध्यमांतून पाच कोटी ६ लाख ८९ हजार ८४६ रुपयांचे उत्पन्न दान मिळाले.नवरात्रोत्सव १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान साजरा झाला.

मंदिर समितीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देणगी दश॔नातून दोन कोटी २५ लाख ५२ हजार ९०० रुपये मिळाले. सिंहासन पेटीतून १ कोटी ४८ लाख ८३ हजार ३५०, मंदिरातील विविध दान पेट्यांत भाविकांनी अर्पण केलेले तून १ कोटी २ लाख ३८ हजार ९२०, विश्वस्त निधीमध्ये २३ लाख ४९ हजार ९९० रुपये मिळाले आहेत. तुळजाभवानी मातेला अनेक भाविक टपालाने पैसै (मनी ऑर्डर) पाठवतात. या माध्यामातून २ लाख ३२ हजार ४८४ रुपये मंदिराला मिळाले. धनादेशाद्वारे १ लाख ९२ हजार, ऑनलाइन देणगीमधून १ लाख ५० हजार ३४७, नगद अप॔णच्या माध्यमातून १३ हजार ६२६, गोंधळी, जावळ आदींतून १ हजार ३२० रुपये मंदिराला मिळाले.नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी मातेला भाविकांनी सोने-चांदी अर्पण केली. १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान सुमारे एक किलो सोने तर १७ किलो चांदी मिळाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button