
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे जन आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील जन आरोग्य समितीची सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आरोग्य विषयक विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला. आरोग्य केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सुविधा व सेवा गुणवत्तेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णांना अधिक दर्जेदार व प्रभावी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी हे उपस्थित होते. सहअध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, सचिव डॉ. ऋषिकेश डोके यांच्यासह माजी सरपंच श्रीमती कल्पना पक, भगवतीनगरच्या सरपंच श्रीमती प्रगती भोसले, सदस्य श्री. कल्पेश सुर्वे, श्री. दीपक दुर्गवली, श्रीकांत राजवडकर, श्री. अमित पाटील, श्री. बावा हळदणकर,श्री. प्रकाश कदम, श्रीम. आर्या पेडणेकर, मुख्य सेविका श्रीम.संपदा भागवत, श्रीमती स्वानंदी पवार, पत्रकार श्री. वैभव पवार, आरोग्य सहाय्यक श्री. संजय बारिंगे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. जन आरोग्य समितीच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली.




