
ब्राऊन हेरॉईन बाळगल्याच्या संशयातून तरूणाला अटक
रत्नागिरी शहरालगतच्या कर्ला येथे ब्राऊन हेरॉईन बाळगल्याच्या संशयातून तरूणाला अटक करण्यात आली. फैजल मकसूद म्हसकर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फैजल याच्या ताब्यातून पोलिसांनी ब्राऊ हेरॉईन सदृश्य २१ पुड्या जप्त केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून कर्ला बसस्टॉप येथे छापा टाकला. यावेळी संशयित आरोप फैजल याच्या ताब्यात ब्राऊन हेरॉईन सदृश्य २१ पुड्या आढळून आल्या.
www.konkantoday.com