बीडच्या पार्श्‍वभूमीवर कोकणातील आमदारांच्या घरांना पोलीस संरक्षण

मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून यातूनच काही आमदारांची घरे, कार्यालये लक्ष्य करण्यात आली असल्याने येथील पोलीस दल सतर्क झाले आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, राजन साळवी यांच्या घरांसह कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे  आला असून सध्या तो चांगलाच पेटला आहे. यातूनच काही आमदारांची घरे व कार्यालये पेटवण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे असा प्रकार येथे घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने अगोदरच खबरदारी घेतली आहे. यातूनच वरील ३ आमदारांच्या घरांसह कार्यालयाबाहेर २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button