खेडमध्ये आढळले ११ डेंग्यूसदृश्य रूग्ण बरे


खेड शहरासह ग्रामीण भागात फैलावलेली डेंग्युची साथ आटोक्यात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागाची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. साथ नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसात आढळलेल्या १५ डेंग्यूसदृश रूग्णांपैकी ११ रूग्ण बरे झाले असून सद्यस्थितीत ४ डेंग्यूसदृश रूग्ण सक्रिय असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात डेंग्यू साथीचा फैलाव वाढत असतानाच ग्रामीण भागातही डेंग्यूसदृश रूग्ण आढळून येत असल्याने तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोय विभागाकडून शहरासह ग्रामीण भागात डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वेक्षणासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button