
शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रालाच होती. अशातच दोन्ही गट शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं.पण या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तशी माहितीच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. तसेच, शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल मैदानावर होणार असला तरी, ठाकरेंना मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
www.konkantoday.com