कोकण मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना आता एलएचबी डबे


कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांसह धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डब्यांसह धावणार आहेत. जामनगर – तिरुनेलवेली – जामनगर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस आणि हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आणि वेगवान प्रवासासाठी जुन्या प्रकारातील आयसीएफ डब्याचे रुपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात ही प्रक्रिया सुरू असून, शेकडो रेल्वेगाड्या एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आता कोकण रेल्वेवरील एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button