खेडमध्ये उद्योजकाची फसवणूक; 85 लाख 82 हजार 161 रूपये परस्पर काढले

खेड : शहरातील वृद्ध उद्योजकाचा विश्वास संपादन करून, त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा उठवून जुन्या पॉलिसीचा संदर्भ घेऊन पी. आर. सर्व्हिसेसशी संबंधित असल्याचे भासवून येथील बँकांमध्ये पत्नीच्या नावे असलेल्या बचत खात्यातून 48 वेळा एनएफटीद्वारे ट्रान्स्फर करून तसेच रोखीने एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक शाखा खेड येथून 85 लाख 82 हजार 161 रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणी प्रकरणी विक्रम सरोही , श्रीवास्तव (संपूर्ण नाव माहीत नाही), राणा (संपूर्ण नाव माहीत नाही), कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित सदाशिव मुदलिक, विठ्ठलभाई मेहेता, अभय शुक्ला, प्रमोद ठाकूर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अरविंद चंदुलाल तलाठी (रा. खेड तीनबत्ती नाका खेड रत्नागिरी) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. ही घटना दि.2 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या कालावधीत घडली असल्याचे निदर्शनास आले आहे. तलाठी यांचा खेड शहरात कौलांचा व्यापार असून त्यांच्या पत्नीच्या नावे येथील बँकेच्या खात्यातून 48 वेळा ट्रान्स्फर करून 85 लाख 82 हजार 161 रूपये परस्पर काढून ही आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्हाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button