
क्रांतीदिनादिवशी देशाला देवगडवासीयांकडून अनोखी मानवंदना
देवगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या नकाशामध्ये तिरंग्याची मानवी प्रतिकृती साकारून ऐतिहासिक देवगड किल्ल्यावरून क्रांतीदिनादिवशी देशाला देवगडवासीयांकडून अनोखी मानवंदना देण्यात आली. देवगड पंचायत समिती, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, नगरपंचायत, महाविद्यालय, हायस्कूल, प्राथमिक शाळा, सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, विविध मंडळे, संस्था व देवगडमधील नागरिक यांच्या साक्षीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रगीताने सर्वांनी एकाचवेळी देशाला मानवंदना दिली. सर्वत्र देशाचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. देवगड पंचायत समितीमार्फत गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीदिनादिवशी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. ऐतिहासिक देवगड किल्ल्यावर देशाचा नकाशामध्ये तिरंग्याची मानवी प्रतिकृती साकारून देवगडवासियांनी देशाला दिलेली अनोखी मानवंदना हे कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या नकाशामध्ये तिरंगी वेशभूषा करून सुमारे 500 नागरिक सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 8 वा. पदयात्रा, मोटरसायकल फेरीने झाली. देवगड तहसील कार्यालय ते देवगड किल्ला अशी फेरी काढण्यात आली. यामध्ये देवगड तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, नगरपंचायत, सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, विविध संस्था, मंडळे, देवगड हायस्कूल, महाविद्यालय, एनसीसी, एनएस्एस् युनिट, होमगार्ड, व्यापारी मंडळ, शहर विकास मंडळ, क्रीडा मंडळ, महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळे, रोटरी क्लब, बचतगट, देवगड पत्रकार संघ, बार कौन्सिल देवगड, डॉक्टर्स असोशिएशन, इंजिनिअर्स असोशिएशन, न.पं.कार्यक्षेत्रातील शाळा, माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, सागरसुरक्षा रक्षक व देवगडमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी 10.30 वा.ा देवगड किल्ला येथे देशाला मानवंदना देण्यात आली. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने, तहसीलदार मारूती कांबळे, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, माजी आमदार अॅड.अजित गोगटे, उद्योजक नंदकुमार घाटे, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, सर्व नगरसेवक, पं.स.गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात आदी उपस्थित होते. सकाळी 11 वा. देवगड हायस्कूल, इंग्लिश मिडीयम, आर्ट सर्कल, यांच्यावतीने देेशभक्तीपर गीत गायन करण्यात आले. श्रावणी मराठे या विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. जि.प.सदस्या सौ.मनस्वी घारे यांनी गायलेल्या ङ्गए मेरे वतन के लोगोफ हे देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा दिला. देवगडमधील स्वातंत्र्यसैनिकांचा कुटुंबियांचा व एनसीसी कॅडेट प्रतीक घाडीगांवकर याचा सन्मान करण्यात आला. यानंतर तिरंगी फुगे हवेत सोडून राष्ट्राला मानवंदना देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पं.स.कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी निलेश जगताप, अंकुश जंगले, शिक्षक सचिन जाधव, जामसंडे हायस्कूलचे कलाशिक्षक मृत्युंजय मुणगेकर, केसर चोपडेकर, अनिकेत पेडणेकर, दर्शन सुतार, स्वप्नील सुतार, पं.स.व न.पं.कर्मचारी यांनी विशेष सहकार्य घेतले.