जालगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दापोली : तालुक्यामधील जालगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तुझी व्हिडिओ क्लिप व्हायरल करेन अशी धमकी दिली.
पीडित मुलीने सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button