खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यासाठी कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी शासकीय जमिनीचे हस्तांतरण आदेश पारित

रत्नागिरी,- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लोकसभा सदस्य खासदार सुनील तटकरे यांनी कौशल्य विकास मंत्री नबाब मलिक यांच्याकडे मौजे हर्णे,तालुका दापोली येथे शासकीय जागा उपलब्ध असल्याबाबतचे पत्र दिले होते.
त्यानुषंगाने कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय मुंबई चे सहसचिव यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याकरिता सुमारे 25 एकर जमीन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविले.
या पार्श्वभूमीवर मौजे कर्दे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील सर्व्हे नंबर 51 हिस्सा नंबर 19 क्षेत्र पोटखराबा 7.6 900 हेक्टरही जागा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत कृषी व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या नावे महसूल मुक्त व सारा माफीने हस्तांतरित करण्याचे आदेश रत्नागिरी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी नुकतेच पारित केले आहेत.
लोकहितास्तव सतत प्रयत्नशील असलेले, तशी दूरदृष्टी लाभलेले खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून एक महत्त्वाची प्रशिक्षण संस्था रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरू होणार असल्याने रत्नागिरीवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button