
रत्नागिरीच्या शाश्वत मानकरची ‘महाराष्ट्र श्रीमान’ची हॅट्ट्रिक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना शाश्वत मानकर याने महाराष्ट्र श्रीमान 2022 या चुरशीच्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या स्पर्धकावर मात करून महाराष्ट्र श्रीमान 2021-22 हा मानाचा किताब मिळविला. शाश्वतने महाराष्ट्र श्रीमान हा किताब सलग तीनवेळा मिळविला आहे. महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटनेची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपदाची शरीरसौष्ठव स्पर्धा नुकतीच औरंगाबाद येथे झाली. शाश्वतने (2019-2020-2021-2022) या वर्षांमध्ये यश मिळवले. 2019-20 रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना बंगळूरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारत श्रीमान 2019-20 हा मानाचा किताब मिळविला. त्यामुळे रत्नागिरीतील सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
शाश्वतने या तीन वर्षात जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धा गाजविल्या आहे. फ्लेक्स हार्डकोअर रत्नागिरीचे संदीप नाचणकर यांचे त्याला मार्गदर्शन मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, सचिव शैलेश जाधव उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, दिनानाथ कोळवणकर, जितेंद्र नाचणकर, दिनकर पवार, संदेश चव्हाण, दिलीप कारेकर, भारत बजागे, नित्यानंद भुते, श्रीराम डाफळे, इम्तियाज काझी, बावा नाचणकर, फैयाझ खतिब, भैय्या कदम, प्रसाद करमरकर, राज नेवरेकर, अंकुश कांबळे, संजय रावणांक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी व्यायामपटू क्रीडाप्रेमींनी शाश्वतचे अभिनंदन केले.