चिपळुणातील उद्योजकांना कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज द्या

चिपळूण शहरासह खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या मालमत्तेचे सुमारे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे उद्योजकांसमोर मोठे संकट आहे. उद्योग नव्या जोमाने सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज उद्योजकांना द्यावे, यांसह अनेक मागण्या नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनने खासदार अरविंद सावंत यांच्याकडे केल्या. अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते याचबरोबर १४ गावांत मोठे नुकसान झाले. खेर्डी औद्योगिक वसाहतीला फटका बसला असून, उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button